Events / उपक्रम

पाककला स्पर्धा

महिलांसाठी पक्कला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नृत्य स्पर्धा

महिला व मुलांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

चित्रकला स्पर्धा

शिवजयंती निमित्त लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ब्युटी पार्लर कोर्स

महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सौंदर्य आणि आत्मनिर्भरतेचा संगम साधणारा हा उपक्रम खूपच यशस्वी ठरला. शिक्षण आणि सक्षमीकरणाचा हा सुंदर प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला. आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल, सौंदर्य शिक्षणाने सजलेला प्रवास.

धान्यवाटप

वांद्रे येथे धनत्रयोदशीच्या निमित्ताने धान्याचे वाटप केले गेले. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा हा क्षण खूपच खास होता.

स्नेहवन भेट

आम्ही  स्नेहवन आळंदी पुणे येथे भेट दिली आणि तेथील मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत काही अविस्मरणीय क्षण घालवले.

NAB LIONS HOME FOR AGING BLIND भेट

आम्ही NAB LIONS HOME FOR AGING BLIND, खोपोली येथे भेट दिली आणि तेथील वृद्धांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत काही अविस्मरणीय क्षण घालवले.

होळी निमित्त पुरणपोळी वाटप

होळी निमित्त टाटा हॉस्पिटल, मुंबई येथे पुरणपोळी वाटप. प्रेम आणि आनंद वाटण्याचा एक साधा,पण खास उपक्रम. गोड चवीने आणि रंगांनी भरलेला हा सण, खास लोकांसोबत साजरा करण्याचा आनंद रोग्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सवाचा रंग फुलवण्याचा एक छोटासा प्रयत्न.

धान्यवाटप

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धान्याचे वाटप करण्यात आले. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा हा क्षण खूपच खास होता. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत स्वप्नसाफल्य परिवाराने राबवला. या प्रसंगी संस्थेच्या सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा अभिमान व्यक्त केला. गरजूंसाठी हाच खरा आनंद आणि समाधान असल्याचे सर्वांचेच मत होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आणि आपल्या समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

वर्धापनदिन

६ जुलै २०२४ रोजी आम्ही आनंद आणि प्रेमाने भरलेले स्वप्नसाफल्याचे दोन वर्षे पूर्ण झाल्याचा वर्धापनदिन साजरा केला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून, संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील ध्येय-धोरणांवर चर्चा करण्यात आली. स्वप्नसाफल्याच्या संस्थापकांनी त्यांच्या अनुभवांची आणि या प्रवासातील आठवणींची आठवण करून दिली. अल्पोपहार आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सर्व सदस्यांनी सहभाग घेतला. आनंदी आणि उत्साही वातावरणात, एकमेकांच्या सहवासात वेळ घालवण्याचा अनुभव सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. स्वप्नसाफल्याचा हा प्रवास असाच यशस्वीपणे पुढे चालू राहो, अशी सर्वांनीच मनोकामना व्यक्त केली.